सामान्य जनतेच्या आवाजाला दाबणाऱ्या सत्ताधारी भाजपाला हद्दपार करण्याची संधी गमवू नका- आ प्रणितीताई शिंदे

सामान्य जनतेच्या आवाजाला दाबणाऱ्या सत्ताधारी भाजपाला हद्दपार करण्याची संधी गमवू नका- आ प्रणितीताई शिंदे 

मंगळवेढा / प्रतिनिधी -

 सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा व प्रचार दौऱ्यादरम्यान आ प्रणितीताई शिंदे मरवडे येथे बोलत होत्या. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण बांधवांच्या समस्या जाणून घेत, या दुष्काळी भागातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी अपेक्षित अशा सर्व गोष्टी येणाऱ्या काळात प्राधान्याने पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी दिला.


गेली १० वर्षे जातीधर्माचे राजकारण करून सामाजिक वातावरण दूषित करून राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजपाने प्रत्येक वेळी जातीय तेढ निर्माण करून, कट कारस्थाने रचून सर्वधर्म संस्कृतीवर मोठा घाव घालण्याचे काम या सत्ताधारी भाजपा पक्षाने केल्याची जोरदार टीका आ शिंदे यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. मागच्या १० वर्षात विरोधकांना संपवण्याचे, त्यांना चुकीच्या पद्धतीने केसेस टाकून अडकवण्याचे, दडपशाही पद्धतीने नामोहरम करण्याचे प्रकार सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहेत.हे लोकशाहीला घातक आहे. देशातील जुलमी राजवट संपवून लोकशाही जपण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एक दिलाने काम करत महाविकास आघाडीचा सोलापूर लोकसभेत विजय घडवून आणावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सोलापूरकरांसमोर असणाऱ्या महागाई, बेरोजगारी व दुष्काळ यांसह देशात संविधानविरोधी कारवाई करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला.

यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार, प्रा शिवाजीराव काळुंगे, जि प चे माजी सदस्य अर्जुन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भारत मासाळ, माजी सरपंच दादासाहेब पवार,दामोदर घुले, फिरोज मुलानी, महादेव जाधव, साहेबराव पवार, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर कोंडूभैरी, काँग्रेसचे प्रशांत साळे, पांडुरंग जाधव, अशोक चेळेकर,पांडुरंग जावळे, मनोज माळी, अमर सूर्यवंशी, अशोक शिवशरण,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला भगिनी व इतर ग्रामस्थांनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.