मंगळवेढा / प्रतिनिधी :—
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील जिल्हा परिषद शाळेत वाढत्या उन्हापासून रक्षण व्हावे ,शाळेतून घरी जाताना मुलांच्या डोक्यावरती सावली असावी.या निर्मळ भावनेतून नेक्स्टजेन कंपनी व उद्योजक खंडेराव गायकवाड यांचेवतीने आदर्श ढवळस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टोप्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी नेक्स्टजेन कंपनीचे प्रमुख कनान साहेब व उद्योजक खंडेराव गायकवाड यांचा मुख्याध्यापक सुर्यकांत जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.चांगल्या दर्जाच्या,विविध रंगाच्या टोप्या मिळाल्या मुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता.
पुढील शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना प्रवास,भोजनासह एकदिवसीय सहलीचा खर्च कंपनीकडून केला जाईल असे आश्वासन कनान साहेब यांनी दिले.शाळेचा निसर्गरम्य परिसर व शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविक सहशिक्षक संभाजी सुळकुंडे यांनी केले.आभार मोहन लेंडवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयसिंह गायकवाड,विष्णू कुंभार,मनिषा जगताप,राजश्री माळी यांनी परिश्रम घेतले.