मंगळवेढा /प्रतिनिधी : -
भाजपने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे नियोजन सुरू केले आहे. भाजप नेत्यांच्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी लक्ष्मी पेठ, मरिआई चौकातील भंडारी मैदानावर सभा होईल.
भाजपसाठी जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचे मानले जातात. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्यांनी सांगली, सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघासाठी सांगोला येथे जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र आता सांगलीमध्ये ३० एप्रिल रोजी स्वतंत्र जाहीर सभा होणार आहे.
सांगलीची सभा झाल्यानंतर मोदी सोलापुरात येतील.
प्रदेश भाजपने स्थानिक नेत्यांना लोकसभा हा निरोप पाठविल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर विमानतळाच्या रनवेची दुरुस्ती आहे. जाहीर सभेची जागा, हेलिकॉप्टर्स उतरण्याची जागा जवळ असावी, या दृष्टीने मैदानाचा शोध सुरू होता. हा शोध भंडारी मैदानावर संपला. या सभेला माढा, सोलापूर मतदारसंघातून कार्यकर्ते जमविण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरू केला आहे.