गेल्या दोन टर्ममधील खासदारकी काळात निर्माण झालेला विकास बकलॉक भरून काढण्यासाठी आपल्या सेवेची संधी द्या- आ.प्रणितीताई शिंदे

गेल्या दोन टर्ममधील खासदारकी काळात निर्माण झालेला विकास बकलॉक भरून काढण्यासाठी आपल्या सेवेची संधी द्या- आ.प्रणितीताई शिंदे 

मंगळवेढा /प्रतिनिधी - 

सध्याच्या परिस्थितीमध्ये सोलापूर लोकसभेत गेल्या दोन टर्ममध्ये आपण ज्या भारतीय जनता पक्षांच्या दोन खासदारांना सलग दहा वर्षे संधी दिली परंतु त्यांच्याकडून कोणतेही विकास काम मतदारसंघांमध्ये मार्गी न लागल्याने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे आशीर्वादाच्या रूपाने उभे राहून गेल्या दोन टर्म मधील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार म्हणून मला संधी द्या मी आपण दिलेल्या संधीचे नक्की सोने करेन अशी भावनिक साद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी प्रणित सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी घातली आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार शिंदे या आजपासून मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान त्या बावची येथे बोलत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून रखडत असलेला मंगळवेढा उपसा सिंचन पाणी प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण वेळोवेळी विधिमंडळात या विषयावर आवाज उठवला होता. तत्पूर्वी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व या मतदार संघाचे माजी दिवंगत आमदार स्व.भारत भालके या मंडळींनी ही अतिशय मोठा संघर्ष करून या योजनेचा मंजूर होण्याचा मार्ग सुकर केला होता. अखेर ती योजना या सर्वांच्या प्रयत्नांतून मार्गी लागल्यामुळे या भागातील जनतेचा दुष्काळाचा वनवास संपून धोरणात्मक प्रगतीचा राजीव निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, देश स्वतंत्र झाल्यापासून राष्ट्रीय काँग्रेसने कष्टकरी, शेतकरी, असंघटित कामगार वर्ग आदी सामान्य वर्गांना केंद्रस्थानी ठेवून अतुलनीय कार्य केले आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून जातीपातीचे राजकारण करणाऱ्या काही घटकांनी या देशाला मूळ मुद्द्यांपासून दूर नेत केवळ फोडाफोडीचे राजकारण करून देशाची भावना खोलवर रुजवली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील या सर्व बाबींवर विकासाच्या रूपाने रामबाण उपाय करण्यासाठी पक्षाने माझ्यावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रगतीच्या भावपूर्ण करण्यासाठी ही जबाबदारी सोपवली निश्चितच आपल्या सर्वांच्या पाठिंब्या सोलापूर लोकसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर वर्षानुवर्ष रखडलेली ही कामे पूर्ण करणे ही मी माझी जबाबदारी समजते.आपल्या सर्वांचा विश्वासाला तडा जाईल अशा प्रकारचे कुठलीही काम माझ्याकडून होणार नाही, हा शब्द मी या निमित्ताने देऊ इच्छिते असे आवाहन करून आमदार प्रणिती शिंदे यांनी सोबत येण्याची विनंती केली, या गाव भेट दौऱ्यात काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, सरपंच दशरथ उर्फ राजू गाढवे, खुपसंगीचे माजी सरपंच शहाजान मुलांनी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, पांडुरंग जावळे, अशोक चेळकर, नाथा ऐवळे यांच्यासह ग्रामस्थ व मतदार बंधू-भगिनींना मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.