राम सातपुते यांच्या भेटीचा धूम धडाका ; यांची घेतली दिवसभरातून भेट

राम सातपुते यांच्या भेटीचा धूम धडाका ; यांची घेतली दिवसभरातून भेट

मंगळवेढा / प्रतिनिधी : -

भाजप कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते यांचे सोलापुरात जंगी स्वागत झाले, त्यावेळी मोटारसायकल रॅली काढून सोलापूरकरांचे लक्ष वेधले. शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन केले, मंदिरात जाऊन ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे दर्शन घेतले. बुधवारीही त्यांनी आपल्या भेटीचा धडाका सुरू ठेवला.
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.

इंडियन मॉडेल स्कुलचे संस्थापक ए. डी. जोशी सरांशी त्यांच्या स्कूल मध्ये भेट घेत संवाद साधला. यावेळी त्यांचे चिरंजीव अमोल जोशी सर यांनी रामभाऊ सातपुते यांचे स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटी दरम्यान सोलापूरमधील शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
पूर्व विभाग श्रीराम मंदिर येथे भाजप प्रभाग क्रमांक 9 आणि माजी नगरसेवक मेघनाथ येमूल मित्र परिवारातर्फे स्वागत आणि सत्कार करण्यात आले आहे.
अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती श्री वेणुगोपाल जिला (पंतलू) यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.
माजी आमदार नरसिंगजी मेंगजी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नरसिंगजी मेंगजी यांनी लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या,
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान दिलीपभाऊंनी लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.