मंगळवेढा/ प्रतिनिधी :—
समग्र शिक्षा अंतर्गंत राष्टीय अविष्कार अभियानातून चालू वर्षी सोलापूर जिल्हा परिषदेनेकडून शैक्षणिक सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.प्रत्येक तालुक्यातून आर्थिक दुर्बल व मागास घटकातील प्रत्येकी एक मुलगा व मुलगी अशा एकुणात वीस विद्यार्थ्यांना या सहलीचा लाभ होणार आहे.
या सहलीसाठी जिल्हा परिषद आदर्श ढवळस शाळेतील प्रबुध्द अशोक माने व कु.गौरी रमेश मोरे हे दोघेजण सहलीसाठी आज रवाना झाले.२८ ते ३० मार्च या तीन दिवसात हे विद्यार्थी रांजणगाव,आदर्श शाळा वाबळेवाडी,जुन्नूर,शिवनेरी,ओझर,लेण्याद्री,मुरूड,जंजिरा, रायगड या पर्यटन स्थळांना भेट देणार आहेत.सहलीचे नियोजन प्रमुख व मार्गदर्शक म्हणून जि.प.कवठे शाळेचे मुख्याध्यापक शांतप्पा हेगोंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मंगळवेढा,पंढरपूर,सांगोला,माढा,माळशिरस,करमाळा शाळेतील विद्यार्थी गुरूवारी सकाळी टेंभुर्णी येथून सहलीत सहभागी झाले.
ढवळस शाळेतील विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी पी.के.लवटे,केंद्रप्रमुख पी.जी.राठोड,सरपंच रोहिणीताई हेंबाडे शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर मोरे,उपाध्यक्ष रतिलाल मस्के,पंपूशेठ मोरे,मुख्याध्यापक सुर्यकांत जाधव व सर्व शिक्षकांनी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यातून डिसेंबर जानेवारी महिन्यात अशा सहलींचे नियोजन करावे,अशी विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी होत आहे.