मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
महाविद्यालयीन जीवनात सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, मंगळवेढा यांच्यावतीने दि.27 मार्च 2024 रोजी राज्य परिवहन मंगळवेढा बसस्थानक तसेच आगारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांनी बसस्थानक परिसरातील पालापाचोळा, कचरा गोळा केला. सामाजिक बांधीलकी जोपासत ही स्वच्छता मोहिम राबविल्याचे संस्थेचे प्राचार्य डी.वाय.ओंबासे यांनी सांगितले.
शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगळवेढा यांनी यापूर्वीही मंगळवेढा आगार व बसस्थानकावर स्वच्छता मोहिम राबविली आहे. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगळवेढा यांचा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन काम करित असते. आजही संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी आगार व बसस्थानकावर वाळला पालापाचोळा, कचरा, प्लास्टिक बाटल्या, उचकटलेले दगडगोटे गोळा करुन संपूर्ण परिसराची साफसफाई केली.
सदर मोहिमेत संस्थेचे प्राचार्य श्री.ओंबासे सर, एस.एस.गोडसे , खमितकर मॅडम, पी.डी.खामकर सर, पी.आर.गायकवाड सर, डी.आर.देठे सर, व्ही.व्ही.ताठे सर, एम.व्ही.केंगार सर, टी.एस.इंगळे सर, के.ए.ताड सर, जाधव सर, गवळी सर व घुनावत सर आदी प्रशिक्षक उपस्थित होते.
तसेच रा.प.मंगळवेढा आगाराचे आगार व्यवस्थापक श्री.संजय भोसले, स्थानक प्रमुख श्री.शरद वाघमारे, वाहतूक निरिक्षक श्री.योगेश गवळी ,लेखाकार श्री.योगेश कांबळे, वरिष्ठ लिपिक अमोल काळे, धनाजी पाटील, गणेश गवळी व सचिन माने आदी कर्मचारी उपस्थित होते.