🟣👉 आमदार प्रणिती शिंदे यांची ग्रामविकास मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आग्रही मागणी
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील 50 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे व जनावरांकरीता चारा छावणी उपलब्ध करून देण्यात यावे याबाबत मा. गिरीष महाजन साहेब, ग्रामविकास विभाग मंत्री व मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे निवेदनावदारे मागणी केली.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी सरासरी पेक्षा खुप कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील 50 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. तसेच कमी पाऊसामुळे जनावरांच्या चारा उपलब्ध होऊ शकला नाही.
त्यामुळे 1) सिध्दनकेरी, 2) हिवरगाव, 3) जालीहाळ, 4) हाजापूर, 5) शिरनांदगी, 6) रड्डे, 7) भाळवणी, 8) येड्राव, 9) तळसंगी, 10) निंबोणी, 11) जिती, 12) जंगलगी, 13) शिवनगी, 14) बावची, 15) खवे, 16) पौट, 17) डिसकळ, 18) येळगी, 19) हुलजंती, 20) सोड्डी, 21) माळेवाडी, 22) कागष्ट, 23) कात्राळ, 24) कर्जाळ, 25) मारोळी, 26) लवंगी, 27) चिक्कलगी, 28) सलगर बु., 29) सलगर खु., 30) असबेवाडी, 31) नंदेश्वर, 32) भोसे, 33) हुन्नूर, 34) महमदाबाद (हुन्नूर), 35) लोणार, 36) पडोळकरवाडी, 37) मानेवाडी, 38) रेवेवाडी, 39) शिरसी, 40) गोणेवाडी, 41) खुपसंगी, 42) पाठ्खळ, 43) मेटकरवाडी, 44) जुनोनी, 45) खडकी, 46) लेंडवे चिंचाळे, 47) लक्ष्मी दहिवडी, 48) आंधळगांव, 49) शेलेवाडी, 50) गणेशवाडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरीता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे.
यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील वरील 50 गावांमध्ये तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकरची सोय व जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावणी उपलब्ध करून देण्यात यावी] याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामविकास विभाग मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.