मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-
मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी गावचे सुपुत्र समाधान भीमराव गोडसे यांची जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा आरोग्य विभागात सोलापूर जिल्ह्यात ओबीसी मधून जिल्हा प्रथम येऊन निवड झाली आहे.
याच्या कुटुंबात आई , भाऊ 1,बहिणी 2 असा परिवार आहे.समाधान हा 5 वी मध्ये असताना वयाच्या 11 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्या मुळे घरातील सर्व जबाबदारी त्याच्या आई वरती पडली होती .आईने दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर कामाला जाऊन मुलांचे शिक्षण ,मुलींचे शिक्षण,मुलींचे विवाह पूर्ण केले. घरातील कर्ता वडील बाबा सोडून गेल्यावर घरातील सर्व जबाबदारी आई सिंधू यांच्या वरती पडली होती.
मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी सारखे ग्रामीण भागातून अत्यंत बिकट परिस्थिती मधून शिक्षण घेत समाधान गोडसे यांनी यशाला गवसणी घातली आहे.
समाधान चे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शदनगर येथे 1 ली ते 4 थी पर्यंत,शरद पवार महाविद्यालय शरदनगर 5 वी ते 12 पर्यंत,दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा BA येथे पूर्ण करून स्पर्धा परीक्षा तयारी सुरू केली.
यानंतर आत्ता जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा आरोग्य विभागात सोलापूर जिल्ह्यात ओबीसी मधून जिल्हा प्रथम येऊन आरोग्य विभागात निवड झाल्याबद्दल शरदनगर- मल्लेवाडी गावातून व तालुक्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.