मारापुर मध्ये मोफत सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीराचे आयोजन

मारापुर मध्ये मोफत सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीराचे आयोजन

मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-

 मंगळवेढा तालुक्यातील मारापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केलेले लोकनियुक्त सरपंच विनायक  यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व  रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. 1 मार्च 2024 रोजी स. 10 वाजता शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूरच्या भव्य प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
     
या शिबिराच्या माध्यमातून अस्थिरोग,त्वचारोग,बालरोग,नेत्ररोग लिपिड प्रोफाइल,रक्तदाब वजन,शुगर, एचबी,सीबीसी,डब्ल्यूबीसी, ईसीजी, हृदयरोग व स्त्रियांचे विकार इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच दातांची व डोळ्यांची तपासणी करून मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
      
या शिबिरामध्ये डॉ.विवेक निकम, डॉ.सौ प्रीती शिर्के,डॉ.धवल आवताडे, डॉ.अमोल चव्हाण,डॉ.नितीन आसबे, डॉ.सदानंद माने,डॉ.सुशांत माने, डॉ.अतुल भालके, डॉ.सौ.मंजिरी आसबे,डॉ.सौ.वसुधा माने,डॉ.विजय लवटे, डॉ.रवींद्र गायकवाड या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.

 तरी सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील रुग्णांनी जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक विनायक यादव मित्रपरिवार मारापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.