लोकाभिमुख राजकीय आवाज जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारितेने समोर येणे काळाची गरज - अभिजीत पाटील

लोकाभिमुख राजकीय आवाज जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारितेने समोर येणे  काळाची गरज -अभिजीत पाटील

मंगळवेढा/ प्रतिनिधी - 

लोकशाही प्रधान भारत देशात चालू राजकीय परिस्थिती व वातावरण पाहता लोकाभिमुख राजकीय भूमिका जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेने समोर येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे. साप्ताहिक मंगळवेढा वेध या वृत्तपत्र समूहाच्या दशकपूर्ती सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन पाटील हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे हे उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक, राजकीय सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक व तालुक्यातील विविध कार्य व कर्तव्य सेवेत बहुमोल आणि आदर्शवत कामगिरी करणाऱ्या आणि गुणीजनांना साप्ताहिक मंगळवेढा वेध यांच्यावतीने पुरस्कार वितरण करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.  मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण,आरोग्य,सहकार, समाजकारण, राजकारण, क्रीडा, कृषी, पशुसेवा, व्यवसाय, सांस्कृतिक, निवेदक अधिक क्षेत्रातील प्रेरक व्यक्तिमत्त्वांना सदर कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर, माजी जि.प.सदस्य शिवाजीराव नागणे, शिक्षक नेते सुरेश पवार, माजी उपसभापती नितीन पाटील, शिक्षक नेते शाम सरगर, लोकनियुक्त सरपंच गुलाब थोरबोले, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कौंडूभैरी, सरपंच धनाजी बिचुकले, कुशाबा पडवळे,  आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंग हैदर केंगार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून साप्ताहिक मंगळवेढा वेध परिवाराची तालुक्यातील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील भूमिका उपस्थितांसमोर मांडली.

पुढे बोलताना चेअरमन पाटील यांनी सांगितले की, संपादक शिवाजी केंगार हे अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्या कार्याची मोहर उमटवलेले एक आदर्शवत आणि प्रेरक व्यक्तिमत्व आहे. त्यांची पत्रकारिता कार्य सेवा ही येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील पत्रकारितेचे एक प्रभावी माध्यम ठरेल असा विश्वास चेअरमन अभिजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष श्रीकांत गणपाटील, शिवसेनेचे संजय गेजगे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी, प्रा.सचिन इंगळे, संपादक प्रमोद बिनवडे, मधुकर भडंगे,  माजी सरपंच रतिलास केंगार, नाना हेगडे, विलास काळे, म्हाळाप्पा शिंदे, महादेव धोत्रे, सचिन हेंबाडे, प्रसाद कसबे, रोहिदास भोरकडे, आदी पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. निवेदक संतोष मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले तर संपादक शिवाजी केंगार यांनी सर्वांचे शेवटी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.