आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीला यश 13 मार्चपासून पाणी सोडण्याचे अखेर सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शिक्का मोर्तब

आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीला यश 13 मार्चपासून पाणी सोडण्याचे अखेर सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शिक्का मोर्तब
मंगळवेढा/सचिन हेंबाडे :-

लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आकारण्यात आलेली वाढीव पाणीपट्टी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून सध्या या हंगामातील एकच पाणीपट्टी भरून घेऊन वीर भाटगर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी 13 मार्चपासून सोडण्यात येणार असून त्या लाभक्षेत्रातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी बोलताना दिली.

 नीरा उजवा व डावा कालवा प्रकल्प सल्लागार समिती सदस्यांची व सिंचन पाण्याचे नियोजन या संदर्भात उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये निरा भाटघरचे पाणी D3 मधून गादेगाव, वाखरी, शिरढोण, कौठाळी , आणि वितरिका क्रमांक ७ मधून उंबरगाव-बोहाळी-कोर्टी- गादेगाव या ओढ्याला पाणी सोडण्यात यावे जेणेकरून जवळच्या गावातील पाणी पुरवठा होत असणाऱ्या विहीरीस पाणी वाढून पिण्यास पाणी उपलब्ध होईल . 

लाभक्षेत्रातील गावांना रांजणी,एकलासपूर,कासेगाव,अनवली खर्डी,तनाळी,तावशी व तपकीर शेटफळ या गावांमध्ये टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे या भागातील शेतकऱ्याची अडचण जाणून घेऊन व पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे समितीच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे माझ्या पाणी मागण्यांची कालवा समितीने दखल घेऊन व सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या १३ मार्च पासून पाणी देणेची कार्यवाही सुरू करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले.

या बैठकीसाठी यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार,मा.मंत्री व आमदार श्री.दत्तात्रय मामा भरणे,आमदार श्री. शहाजी बापू पाटील, आमदार श्री.राम सातपुते, आमदार श्री.राहुल कुल, आमदार श्री रवींद्र दंगेकर दीपक आबा साळुंखे,कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य कार्यकारी अधिकारी हनुमंत गुणाले अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप,कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, डेप्युटी इंजिनिअर अमोल मस्के, शाखा अभियंता धनंजय कोकरे अदिजन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.