शिवसेना शहर अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
(हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त)
मंगळवेढा / सचिन हेंबाडे :-
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मंगळवेढा तालुक्यातील महाराणी ताराबाई हायस्कूल येथे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) शिवसेना शहर अध्यक्ष श्री दतात्रय भोसले शुभ हस्ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शिवसेना शहर अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी प्रशालेला भेट म्हणून 10 ब्रास शहाबादी फरशी तात्काळ उपलब्ध करून देऊन सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रम प्रसंगी जाधव यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्या ची ओळख आपल्या मनोगतातुन शालेय विद्यार्थ्यांना सांगितले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थित नारायण गोवे होते तर शाळेच्या मुख्याध्यापिका निता कदम, बंडु चव्हाण ,मुझ्मिल काझी, रवि कौंडुभैरी,गणेश बाबर , निवृत्ती जाधव, सागर केसरे आदिजन शिवसेना प्रमुख पदाधिकारी,मान्यवर विध्यार्थी उपस्थित होते.