आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज मंगळवेढ्यात; धनश्री व सिताराम परिवाराच्या वतीने संतपूजा व उषा मंगेशकर संगीत सुरेल कार्यक्रमाची मेजवानी

आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज मंगळवेढ्यात; धनश्री व सिताराम परिवाराच्या वतीने संतपूजा व उषा मंगेशकर संगीत सुरेल कार्यक्रमाची मेजवानी


मंगळवेढा /प्रतिनिधी :-

धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळ्या निमित्त दामाजी रोड,मंगळवेढा आज गुरुवार दि.१८ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती धनश्री व सीताराम परिवाराच्या संचलिका अॅड. दिपाली काळुंगे-पाटील यांनी दिली.

सकाळी ९.३० वा. संत परंपरेतील कीर्तनकार व प्रवचन करांचा गौरव म्हणून संतपूजा हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी विष्णुपंत आवताडे हे राहणार आहेत. यावेळी संत विचार आणि आजचा समाज या विषयावर परिसंवाद होणार आहे.
या परिसंवादासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प बापूसाहेब महाराज देहुकर, वासकर महाराज फडप्रमुख ह भ प चैतन्य महाराज वासकर, संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले हे उपस्थित राहणार आहेत.

दुपारी २ वाजता धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टिस्टेट तपपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणुन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजीराव सावंत,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तरकार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.

तसेच धनश्री मल्टीस्टेटच्या आजी-माजी संचालकांचा सत्कार, शिलाई मशीन वाटप, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे अमृत महोत्सवी स्मरणिकाचे प्रकाशन व धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाची सभासदांना भेट देण्यात येणाऱ्या चांदीच्या नाण्याचे अनावरण उपस्थितीत होणार आहे.

मान्यवरांच्या सायंकाळी ७ वा. धनश्री व सिताराम परिवार आयोजित उषा मंगेशकर संगीत रजनी मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार शिरोमणी शुगरचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

यादरम्यान सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, पार्श्वगायिका कविता पौडवाल, हास्यजत्रा फेम पार्श्वगायिका अनुष्का शिकतोडे, महाराष्ट्राचा महागायक विजेता महंमद आयाज, भाग्यश्री चव्हाण हे गायक उपस्थित राहून आपल्या सदाबहार मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.