100 कोटी लसीकरण झाल्याबद्दल मंगळवेढा भाजपकडून मोदीजीना धन्यवाद
मंगळवेढा(प्रतिनिधी):-
भारतीय जनता पार्टी मंगळवेढा यांच्याकडून शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अनोख्या पद्धतीने धन्यवाद देण्यात आले .
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगभरामध्ये कोरोना महामारी ने थैमान घातले असताना सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेला सुरक्षिततेची काळजी लागलेली होती , जगभरामध्ये कोरोना महामारी च्या विरोधात लस शोधण्याचे प्रयत्न सुरू होते . अशा काळामध्ये भारतामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या दृढनिश्चयामुळे भारतामध्ये लस तयार देखील झाली , भारतामध्ये तयार झालेली लस जगभरामध्ये देण्यात आली . आणि भारत देशांमधील आत्तापर्यंत शंभर कोटी जनतेला लस देण्यामध्ये देश यशस्वी ठरला आहे .
माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगामधील सर्वात मोठा लसीकरणाचा विक्रम देशाने केला होता . अडीच कोटी जनतेला लस देण्यात आली होती आणि आता कोरोना मुक्त भारताकडे देशाची वाटचाल माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे . देश सुरक्षिततेकडे जात आहे काही देशांची भारत देशाच्या निम्म्याहून कमी लोकसंख्या आहे तरी त्या देशांना संपूर्ण लसीकरण आज पर्यंत करता आलेले नाही . पण भारत हा एकमेव देश आहे ज्यांनी शंभर कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. माननीय नरेंद्र जी मोदी यांना धन्यवाद देण्याकरता भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारत देशामध्ये "धन्यवाद मोदीजी" अशा पद्धतीचे कार्यक्रम घेऊन या लसीकरणाबाबत नरेंद्र जी मोदी यांना धन्यवाद देत आहे .
आज मंगळवेढा शहरामध्ये मुरलीधर चौक येथील भाजपच्या कार्यालयासमोर शंभर या संख्यामध्ये कार्यकर्ते उभे राहून , भारत माता की जय , वंदे मातरम , मोदी है तो मुमकिन है , भारतीय जनता पार्टी चा विजय असो , अशा पद्धतीच्या घोषणा देत मोदीजीं चे आभार व्यक्त केले व सर्वांना पेढे वाटून जल्लोष व्यक्त करण्यात आला . यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे , राजकीय विश्लेषक दिगंबर यादव , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव , सहकार विभाग संयोजक सत्यजित सुरवसे , युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष नागेश डोंगरे , युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे , नेते विराज आवताडे , ज्येष्ठ नेते सुरेश जोशी , युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विनायक अवताडे , देवा इंगोले , विजय बुरकुल , उमेश आवताडे , रावसाहेब उगाडे , संजय माळी , बंडू आवताडे , सुरज जाधव , पिंटू मोहिते , नंदकुमार हवनाळे , महेश हजारे , संजय माळी , युवा मोर्चा शहर सरचिटणीस अजित लेंडवे , शहर उपाध्यक्ष सुजित निकम , शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काशीद , शहर उपाध्यक्ष रोहित हिरेमठ , चिटणीस फरीद दरवाजकर , चिटणीस संकेत लांडे , चिटणीस पांडुुरंग दिवसे , चिटणीस गणेश चोखंडे , प्रश्नांत चिंचकर , अतुल मुढे , योगेश फुगारे , प्रदीप गायकवाड , साईनाथ , मोहन पांचाळ , दिवसे ,शिवा तटपटे कार्यकर्ते उपस्थित होते .
पत्रकार
सचिन हेंबाडे
मो.नं.9637545262
8668236467