मंगळवेढा (प्रतिनिधी):-
आंबे गावच्या सुकन्या रोहिणी अर्जुन गायगोपाळ यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली आहे.त्यांनी नायब तहसीलदार पदाची परीक्षा यशस्वीरित्या पास केली आहे .
मुळगाव आंबे येथील असून रोहिणी चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आंबे ,उच्च माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे झाले असून याच महाविद्यालयात त्यांनी कमवा व शिका योजनेतून पदवी परीक्षेचे शिक्षण पूर्ण केले. जिजामाता प्रशालेत आदर्श विद्यार्थिनी म्हणून तिने नावलौकिक मिळवला होता . 2018 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या महापोटल परीक्षा पास झाल्यानंतर तिने नायब तहसीलदार पदाचे ध्येय अंगी बाळगून शासकीय सेवा करीत हे यश मिळवले आहे.
रोहिणी गायगोपाळ ही सध्या मंगळवेढा नगरपालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून सेवेत आहे. मात्र नायब तहसीलदार पदाची परीक्षा देऊन त्यामधे यश मिळवले आहे.
या यशाबद्दल रोहिणी गायगोपाळ यांच्या या यशात आई,वडील,भाऊ,मामा, चुलते यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या यशाबद्दल पंढरपूर- मंगळवेढा लोकप्रिय आमदार समाधान (दादा) आवताडे यांनी अभिनंदन केले.तसेच सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
पत्रकार
सचिन हेंबाडे
मो. नं. 9637545262
8668236467