तावशी गावाच्या विकासासाठी सर्वोतपरी मदत करणार - आ. समाधान आवताडे

तावशी गावाच्या विकासासाठी सर्वोतपरी मदत करणार - आ. समाधान आवताडे


 पंढरपूर-( प्रतिनिधी) :- 
                पंढरपूर तालुक्यातील तावशी गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असे मत आमदार समाधान ( दादा ) आवताडे यांनी महादेव मंदिरामध्ये नविन पिंड प्राणप्रतिष्ठापनेच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.तावशी येथील शंभर वर्षापूर्वीचे मंदिर असून यामध्ये श्रावण मासातील शुभ दिवस सोमवार या दिवशी या मंदिरामध्ये नवीन पिंड प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यकुशलता आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते या नवीन पिंडी चा अभिषेक घालून पूजा करण्यात आली.यावेळी मठाधिपती यांच्या हस्ते आमदार समाधान दादा आवताडे यांचा सत्कार करण्यात आला.


           या कार्यक्रमास रेणुकाचार्य मंद्रुपकर महाराज उपस्थित होते .त्यांचे सोबत गौरीशंकर बुरकुल, बाळासो  यादव, सुभाष आण्णा  यादव, भुजंगराव दादा यादव,पांडुरंग आसबे, भारत  रणदिवे, शिवाजी शिंदे,किसन आसबे , रामभाऊ आसबे,सरकारराजे यादव,अलाउदीन मुलाणी, साहेबराव सातपुते, तात्यासाहेब यादव,सतिश कोपे, दिलिप पावले, शेखर कोपे, अभिजित शिंदे, व पंढरपूर जनसंपर्क कार्यालय प्रमुख श्री.बालम मुलाणी आणि विरशैव संघटनेतील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.