मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अरळीत रक्तदानाचा महायज्ञ; ११० रक्तदात्यांनी दिले जीवनदानाचे व्रत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अरळीत रक्तदानाचा महायज्ञ; ११० रक्तदात्यांनी दिले जीवनदानाचे व्रत

 मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाणीदार आमदार मा. समाधानदादा अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. रमेश भांजे आणि पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री कवचाळे यांच्या पुढाकारातून मौजे अरळी येथील माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर अभूतपूर्व उत्साहात पार पडले. समाजसेवा, मानवता आणि लोकसहभागाचा प्रेरणादायी संगम ठरलेल्या या शिबिरात तब्बल ११० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदानाची अमूल्य भेट दिली.

"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करत युवक, शेतकरी, शिक्षक, व्यापारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. रक्तदानासाठी सकाळपासूनच रक्तदात्यांची रांग लागली होती. समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि सेवाभाव याचे दर्शन या शिबिरातून घडले.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धू सावकार, गंगाधर काकणकी, श्रीमंत म्हेत्रे, शशिकांत बुगडे, श्रीमंत केदार, विठ्ठल येणपे, विनोद पाटील, विश्वनाथ पाटील, भारत पाटील, संजीव कवचाळे, विजू भोसले, धनु पवार, शिवाजी मोहिते, अशोक भिंगे, कासलिंग स्वामी, श्रीशैल भांजे, मल्लिकार्जुन भांजे, देविदास घोडके आणि राजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे केवळ दान नसून समाजाप्रती असलेले सर्वोच्च कर्तव्य असल्याचे सांगत युवकांना नियमित रक्तदानाचे आवाहन केले.

जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे यांनी रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते, त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन केले. पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांनी समाज हितासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त करत सर्व रक्तदाते, वैद्यकीय पथक आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. 

  वैद्यकीय पथकाने सर्व रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन केले. संपूर्ण शिबिराचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. 

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सावंत सर यांनी केले तर बिराजदार सर यांनी उपस्थित मान्यवर रक्तदाते, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. 

110 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागामुळे अरळी गावाने समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला असून मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा रक्तदानाचा महायज्ञ संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.