जिल्हा परिषदेची बंद पडायच्या मार्गावर असलेली शाळा पुन्हा सुरू करण्यात तरुण युवक, पालकांना यश;नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात बाल चिमुकल्यांच्या अनोख्या स्वागताने...

जिल्हा परिषदेची बंद पडायच्या मार्गावर असलेली शाळा पुन्हा सुरू करण्यात तरुण युवक, पालकांना यश...

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात बाल चिमुकल्यांच्या अनोख्या स्वागताने...

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही पूर्णपणे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.या शाळेमध्ये गावातील ग्रामस्थ,पालक एक ही विद्यार्थी शाळेत घालत नव्हता शेजारच्या गावातील खाजगी शाळेत घालत होते. युवकांनी एकत्र येऊन शाळा सुरू केली.
या शाळेमध्ये शिक्षक नव्हते पूर्णपणे बंद पडायच्या मार्गावर होती, तांडूर गावातील युवा वर्ग,तरुण पिढीनी एकत्र येऊन ही जर शाळा एकदा शाळा बंद पडली तर आम्हाला मुलांना बाहेरगावी शाळेला शिक्षणासाठी घालावे लागेल या उद्देशाने , मतदान जरी करायचे असलं तरी आम्हाला त्या शाळेमध्ये मतदान करता येत नव्हतं दुसऱ्याच्या गावी जाऊन मतदान करावे लागेल आदी गोष्टी लक्षात घेऊन आम्ही सर्व पालक मिळून विजयकुमार कल्लाप्पा मळगे, मेंबर गणेश मळगे ,प्रवीण चौगुले, संग्राम मळगे , राजकुमार मळगे, प्रवीण भोसले ,वैभव पाटील ,नंदकुमार मळगे, प्रकाश चौगुले,बचत गटाचे अध्यक्ष मंजुळा गायकवाड, अंगणवाडी आसबे मॅडम,भौरुबाई गणपती मळगे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक सिद्धेश्वर कांबळे या सर्वांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्व पालकांना शाळेविषयी माहिती देऊन आपल्या शाळेत कसे घालता येईल अशी पूर्णपणे चर्चा करून आज दिनांक २२/०६/२०२६ रोजी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाने सुरूवात केली.
विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन मनपूर्वक स्वागत केले तसेच विद्यार्थांना शैक्षणिक प्रगतीसाठी साहित्य व खाऊ वाटप करून त्यांना नवीन शेक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तांडोर येथील शाळेत पहिल्याच दिवशी कुठेतरी ४-५ विद्यार्थी असणारी शाळा आज त्या शाळेमध्ये ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा पट जमा झाला होता.
गावातील वाड्या वस्तीवरील मुलांना शाळेत येण्या-जाण्यासाठी युवा तरुण मुलांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांना बसची सेवा स्वखर्चातून करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.गावातीलच
जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यां,पालक,ग्रामस्थ यांच्यामध्ये आनंदाने भरलेल्या वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.