सोलापूर जिल्हा विधानपरिषद निवडणूक उद्या मतदान प्रक्रिया...
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
सोलापूर जिल्हा विधान परिषदसाठी (MLC)निवडणुकीत मुख्यतः स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडून आलेले प्रतिनिधींचे मतदान करू शकतात. जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरपालिका नगरसेवक, यांचे मतदान आहे. मंगळवेढा तहसील विधानपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियासाठी सज्ज असून मतदारांनी दिलेल्या वेळेत मतदान करावे असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक- 2026
* मतदान केंद्र क्रमांक - 05
* मतदान केंद्राचे नाव - तहसीलदार कक्ष, तहसील कार्यालय मंगळवेढा
* एकूण मतदार - 62
* मतदान दिनांक - 18/06/2026
* वेळ - सकाळी 8 ते सायंकाळी 4
* मतदान मतपत्रिकेवर घेण्यात येणार
* एकूण 2 उमेदवार
* मतदारांची ओळख पटविण्यासाठी BDO व मुख्याधिकारी यांची नियुक्ती
* मतदारांना निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र व स्थानिक स्वराज्य संस्थेचे ओळखपत्र यापैकीच एक ओळखपत्र सोबत आणावे लागणार, याव्यतिरिक्त इतर कोणतेही ओळखपत्र चालणार नाही.
* मतपत्रिकेवर मतदारांना उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम दर्शवावा लागणार
* मतदारांना मोबाईल, घड्याळ, चष्मा, गॉगल, पेन आणण्यास मनाई करण्यात आली आहे.
* दुपारी 4 वाजता रांगेत नसलेल्या मतदारांचे मतदान केले जाणार नाही
* एका उमेदवाराला 2 मतदान प्रतिनिधी नेमण्यास मुभा
* माध्यम प्रतिनिधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून ओळखपत्र देण्यात आले असून त्यांना मतदान केंद्राच्या बाहेरील व रांगेचे फोटो काढण्यास मुभा असेल, मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मनाई असेल.
* मतदारांना मतपत्रिकेवर पसंतीक्रम दर्शवण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला पेन वापरावा लागणार आहे, स्वतःच्या पेनने मतदान करण्यास मनाई आहे.
* मतदान प्रतिनिधी यांनी सकाळी 7.30 वाजता मतदान केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक
* दिनांक 18 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान असल्याने तहसील कार्यालय, सब रजिस्टर ऑफिस यांचे कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार.
वरील नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले.