प्रसिद्ध व्याख्याते, कवी आणि कीर्तनकार अविनाश भारती यांची प्रमुख उपस्थिती
मंगळवेढा (प्रतिनिधी):-
सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कै. महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्यावतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली इयत्ता १० वी – १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच १० वी – १२ वी नंतर पुढे काय?" या विषयावर करिअर मंत्र मार्गदर्शन कार्यक्रमाचे येत्या रविवारी दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी १०. १५ वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय पंढरपूर-मंगळवेढा बायपास रोड मंगळवेढा येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, कवी व कीर्तनकार अविनाश भारती हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थी, पालक आणि युवकांसाठी ही सुवर्णसंधी असून शिक्षण, करिअर आणि भविष्यातील योग्य दिशा निवडण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी मंगळवेढा नगरीचे उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, पंचायत समिती सभापती दिपाली ताड, नगरसेवक सोमनाथ आवताडे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण, जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, पंचायत समिती उपसभापती अर्जुन मल्लाळे, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, सदस्य डॉ. आप्पासाहेब निकम, सदस्या जयश्री कवचाळे, सदस्या मोहिनी गणपाटील, नगरसेवक अजित जगताप, नगरसेवक चंद्रकांत घुले, नगरसेवक प्रवीण खवतोडे, नगरसेवक गौरीशंकर बुरकुल, नगरसेविका कु.प्रतीक्षा मेटकरी, नगरसेविका विजया गुंगे, नगरसेविका तरन्नूम दारूवाले, नगरसेविका सावित्रीबाई कोंडूभैरी, नगरसेविका मनीषा मेटकरी, नगरसेवक सोमनाथ हुशारे हे स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच कै. महादेवराव बाबुराव अवताडे प्रतिष्ठान पदाधिकारी सर्व संचालक व मंगळवेढा तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी सरपंच, चेअरमन, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर अधिकारी प्रतिष्ठित व्यक्ती या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी या प्रेरणादायी उपक्रमासाठी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.