मारापुर ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
भारतरत्न “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हेच समतेच्या समाजाचे दिशादर्शक असून त्यांच्या कार्यामुळेच सर्वसामान्यांना न्याय व अधिकार मिळाले,” असे प्रतिपादन मारापुरचे आदर्श सरपंच तथा पंचायत समिती सदस्य श्री विनायक यादव यांनी केले. मारापुर ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी ते बोलत होतें.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य श्री चैतन्य सातपुते यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी श्री भगवान आसबे, श्री विक्रम यादव, श्री बाळासाहेब वाघमारे, श्री ब्रह्मदेव वाघमारे व श्री अशोक आसबे यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री विनायक यादव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधान निर्मितीतील अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. समाजातील सर्व घटकांना समान न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण उपस्थितांना करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी श्री महादेव भुसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चेअरमन श्री राजकुमार यादव यांनी केले. या कार्यक्रमासाठी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.