शहर व ग्रामीण भागाला सुरळीत गॅस व रॉकेलचा पुरवठा होणेबाबत धान्य दूकानदाराची बैठक संपन्न...

शहर व ग्रामीण भागाला सुरळीत गॅस व रॉकेलचा पुरवठा होणेबाबत धान्य दूकानदाराची बैठक संपन्न...

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

 मंगळवेढा शहर ग्रामीण भागातील गॅस वितरक व स्वस्त धान्य दुकानदार यांची पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी बैठक घेवून वस्तुस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान यामध्ये केरोसीन वाटपाबाबत स्वस्तधान्य दुकानदारांना सुचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सध्या युध्दामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने ग्राहकामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. गॅस पुरवठा सुरळीत ग्राहकांना व्हावा या हेतुने पुरवठा विभागाने गॅस एजन्सीवाल्याची बैठक घेतली.

 यामध्ये ब्रम्हपुरी,हुलजंती,लक्ष्मीदहिवडी येथे पुर्वीप्रमाणे गॅस वितरण चालू असल्याचे सांगण्यात आले. शहरामध्ये लोकसंख्येच्या तुलनेने गॅस चार ते पाच दिवस उशिराने मिळत आहे. गॅस वितरण ओटीपीनुसार देण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सुचनेनुसार सर्व वाटप सुरळीत चालू आहे. सध्या 25 दिवसानंतर गॅसचे बुकींग सुरु आहे. व्यावसायिक सिलेंडर देणे पुर्णत: बंद करण्यात आले आहे. सध्या 12 हजार लिटर रॉकेल उपलब्ध असून त्यानुसार ग्राहकांना रॉकेल पुरवठा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

यासाठी आवश्यक ती लागणारी साधानसमुग्री,वजन, माप,बॅरल आदी साहित्यांची तयारी करण्याच्या सक्त सुचना देण्यात आल्याचे पुरवठा निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.