मंगळवेढा शहरातील तुकाईनगर भागात घरगुती गॅस टाकीचा घरात स्फोट ; एक वयोवृद्ध आजी घरगुती गॅस स्फोटात जखमी...

मंगळवेढा शहरातील तुकाईनगर भागात घरगुती गॅस टाकीचा घरात स्फोट...

एक वयोवृद्ध आजी घरगुती गॅस स्फोटात जखमी...

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

 मंगळवेढा शहरातील तुकाईनगर परिसरात राहणार्‍या रमेश बाबर व सचिन बाबर या कुटूंबियाच्या निवासस्थानी रविवार सायंकाळी 6 वाजता नव्याने आणलेल्या गॅस टाकी मधून गॅस लिकेज होवून स्फोट झाल्याची घटना घडली असून यामध्ये सिंध्दूबाई बाबर ही वयोवृध्द महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

तुकाईनगर मध्ये मुळचे डोंगरगाव येथील असलेले रमेश बाबर व सचिन बाबर यांचे स्वत:चा बंगला असून ते येथे रहावयास आहेत. रविवार दि.29 रोजी त्यांनी गॅस बुकींग करुन गॅसची टाकी घरी मागविली होती. टाकी घरात आणून ठेवल्यानंतर काही वेळातच गॅसचा आवाज सुरु झाला. या दरम्यान बाबर कुटूंबियांनी गॅस वितरणवाल्याला याबाबतची माहिती दिली. तो पर्यंत गॅसचा स्फोट झाला.

 या गॅसच्या स्फोटामुळे परिसर हादरुन गेला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत आले. त्यांनी प्रथमत: गॅसची टाकी रस्त्यावर आणून ठेवली. तात्काळ गॅस रिपेअर करणारे कर्मचारी बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी केल्यावर गॅसचे वायसर लुज राहिल्याने त्यामधून गॅस बाहेर येवून स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.

 या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की बंगल्याच्या खिडकीच्या काचाही फुटल्या. एकीकडे युध्द चालू असल्यामुळे गॅस मिळणे मुश्किल होत असतानाच गॅस लिकेजमुळे जी दुर्घटना झाली ती चर्चेचा विषय बनली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.