मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे नूतन जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. करुणाताई जनार्धनमामा शिवशरण यांचा आपल्या जिल्हा परिषद गटातून सुमारे ५ हजारांहून अधिक विक्रमी मताधिक्याने दणदणीत विजय झाला.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर समस्त ग्रामस्थ गणेशवाडी, भाजपा कार्यकर्ते आणि हितचिंतक व माजी सरपंच मा. श्री. पंडीतराव तानगावडे गुरुजी यांच्या उपस्थितीत "दादांचा वाडा" येथे आनंदोत्सव साजरा करून शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.
खरंतर विधानसभा निवडणुकीनंतर हा विजय अत्यंत महत्वाचा होता. सुरुवातीला जड वाटणारा हा विजय केवळ लोकव्यासंग संपर्कामुळे आणि आदरणीय आमदार महोदय श्री.समाधानदादा आवताडे साहेब आशीर्वादाने व यांच्या जुन्या आणि यांच्या तरुण सहकाऱ्यांच्या सहकार्याने तसेच जनतेच्या पाठिंबामुळे सुकर झाला.
सौ. करुणाताई यांचा विक्रमी मताधिक्याने झालेला हा विजय केवळ विजय नसून लक्ष्मी दहिवडी गटातील जनतेने त्यांच्या रूपाने स्वीकारलेले नवीन नेतृत्व आहे.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात करत असलेल्या मा. सौ. करुणाताई जनार्धनमामा शिवशरण यांचे आम्हा गणेशवाडीकरांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील सेवा वाटचालीसाठी अनेकानेक सदिच्छा.आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी दहिवडी गटाचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच अपेक्षा आहे.
याप्रसंगी माजी सरपंच सौ. सुप्रियाताई तानगावडे, माजी सरपंच श्री. बापूसाहेब मामा तानगावडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सिद्धेश्वर नाना सोळगे, जेष्ठ मार्गदर्शक श्री. बळीराम आप्पा तानगावडे, श्री. लक्ष्मण आप्पा तानगावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. अशोक तानगावडे मेंबर, श्री. संदीप शिंदे गुरुजी, श्री. मोहन मामा तानगावडे, माऊली उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक श्री. औदुंबर मोरे मालक, श्री. शौकतभाई शेख तसेच ग्रामस्थ-सहकारी व युवा व गुरुजीप्रेमी, मालकप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.