(महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती)
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे सुवर्ण महोत्सवी ५० वे वर्ष विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमातून साजरा होणार असल्याचे स्वागताध्यक्ष आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
दिनांक ११ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थावर होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार आहे बुधवार दि ११ फेब्रुवारी रोजी सायं ५ वाजता भगवी पदयात्रा,सायं ६ वाजता शिवमंचाचे पूजन,सायं ७ वाजता संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते व आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवमुर्तीची प्रतिष्ठापना होणार असुन हत्तीकडून छत्रपतींना मानवंदना देण्यात येणार आहे याप्रसंगी बँड पथक व शंभर बालवारकऱ्यांचा दिंडी सोहळा आकर्षण ठरणार आहे.
गुरुवार दि १२ फेब्रुवारी रोजी सायं ७ वाजता या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते नितीन बानुगडे पाटील रेहमतपूर जि सातारा यांचे व्याख्यान होणार असुन शुक्रवार दि १३ फेब्रुवारी रोजी ७ वाजता हभप गोविंद महाराज गायकवाड,आळंदी यांचे प्रबोधनात्मक सोंगी भारूड होणार आहे शनिवार दि १४ फेब्रुवारी रोजी ७ वाजता स्वराजरक्षक संभाजी महाराज फेम शिवशाहीर संतोष साळुंखे,लातूर यांचा स्फूतीगीते व पोवाड्याचा कार्यक्रम होणार असून रविवार दि १५ फेब्रुवारी रोजी ७ वाजता लोककवी प्रशांत मोरे मुंबई व मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत,अकोला यांचा काव्यमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दि १६ फेब्रुवारी सायं ७ वाजता झी मराठी,सोनी मराठी,कलर्स मराठी झी युवा संगीत सम्राट फेम रामानंद उगले यांचा महाराष्ट्राची लोकगाणी हा लोकगीतांचा कार्यक्रम होणार असुन मंगळवार दि १७ फेब्रुवारी रोजी ७ हभप पुरषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे किर्तन होणार असून बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असणारा स्वराज्याचे आख्यान मुंबई हा कार्यक्रम होणार आहे गुरुवार दि १९ फेब्रुवारी रोजी सुवर्ण महोत्सवीवर्षी शिवजयंतीदिनी सकाळी १० वाजता महिलांच्या भव्य भगवा फेटा रॅलीत स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम प्रतीक्षा लोणकर उपस्थित राहणार आहेत.
तर दुपारी ३ वाजता मंगळवेढा शहरातून विविध वांद्यासहित शिवमुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी न्यु नॅशनल बँड पथक किल्ले मछिंद्रगड, शिवप्रेमी ढोल पथक इचलकरंजी, जयभवानी बँजो पथक बेगमपुर,सुरसंगम बँजो पथक फूलचिंचोली,रितेशकुमार बँजो पथक मंगळवेढा,जगदंबा लेझीम पथक,अर्जुन हलगी मंगळवेढा,ऐतिहासिक मावळे अकलूज,सुरसनई पथक कोळेगाव,मनोरंजन कार्टून विजापूर,शिवमर्दानी खेळ,उंट,घोडे असे अनेक आकर्षक ठरणार आहेत.
तसेच उत्सव कालावधीत शेताकऱ्यांना पीक लागवड कृषी मार्गदर्शन शिबीर,रक्तदान शिबीर,वृक्षारोपण,अन्नदान,फळे वाटप असे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्याण्यात आले आहे.तरी सर्व नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती मंडळ सुवर्णमहोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.