भाजपाच्या संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रमेश जी भांजे यांची प्रचारात मोठी आघाडी ...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटांमध्ये होम टू होम प्रचार करत भाजपाचे उमेदवार रमेश जी भांजे हे मतदारापर्यंत पोहचत असून त्यांना संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटांमध्ये मोठा मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे, गटातील मतदार, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष गाठी-भेटीवर मोठा भर दिला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून झालेला मतदारसंघाचा विकास तसेच संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटात आवताडे परिवाराला राजकीयदृष्ट्या असणारी ताकद आणि आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत झालेली शाश्वत विकास कामे या सर्व बाबींना लक्षात घेऊन मतदारांचा भारतीय जनता पार्टीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. आमदार समाधान आवताडे यांनी कोणत्याही प्रकारे राजकारण न पाहता केवळ मतदार संघाचा केलेला सर्वांगीण विकास आणि त्यांचे विकासाचे व्हिजन या गोष्टींची जाणीव असणारे उमेदवार रमेश जी भांजे यांनी गावभेट दौऱ्यात मतदारांना समजावून सांगत आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी 24 गावे उपसा सिंचन ही महत्त्वाकांक्षी पाणी योजना प्रत्यक्षात सुरू झाल्याने या भागातील दुष्काळाचे सावट संपून लवकरच या भागातील शेतकरी आणि नागरिक सुजलाम-सुफलाम होणार आहेत.
रमेश जी भांजे हे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आज पर्यंत त्यांनी केलेल्या सामाजिक हिताच्या कार्याच्या जोरावर तसेच नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांना मोठे जनसमर्थन प्राप्त होत आहे. त्यांनी आपल्या होम टू होम गाव भेट दौऱ्यामध्ये नागरिकांच्या पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य शिक्षण या समस्या जाणून घेत आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून सर्व समस्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत सोडवण्याचा निर्धार मतदारांसमोर केला आहे.
उमेदवार रमेश जी भांजे यांनी प्रचारामध्ये घेतलेल्या आघाडीमुळे त्यांची प्रतिमा कार्यक्षम व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून जनतेमध्ये पसरत आहे. त्यांच्या या गाव भेट दौऱ्यात त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्येही त्यांच्याबाबत मोठी सकारात्मकता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा जिल्हा परिषद संत दामाजीनगर गटात विजय निश्चित मानला जात आहे.