मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
एक दिवस गावासाठी हा उपक्रम मंगळवेढा शहरात दर रविवारी राबविला जात असून मंदिर किंवा एका परिसराची स्वच्छता करण्यात येते. त्या मोहिमेअंतर्गत रविवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत बोराळेवेस येथील शिवशंकरमठ परिसराची स्वच्छता करण्यात आली.
मंगळवेढा शहरातील जागृक नागरिकां ना एकत्रित घेऊन उपक्रम राबवला जात आहे.यामध्ये मठ परिसरातील पालापाचोळा,नारळाची केसरे,दारुच्या बाटल्या एकत्रित करण्यात आल्या व मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने कचरा उचलण्यात आला.
दर रविवारी होणाऱ्या स्वच्छते मोहिमेमध्ये मंगळवेढा शहरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आव्हान देखील यावेळेस करण्यात आले.
मंगळवेढा शहरातील प्रत्येक धार्मिक स्थळावरती स्वच्छता व नित्य पूजा त्या संबंधित संस्थेने नित्य रूपाने करावी अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
सदर मोहिमेमध्ये नगरसेविका सीमा बुरजे,सोमनाथ बुरजे,दत्तात्रय भोसले,दिलीप स्वामी,सुजित मुदगुल,सुधीर शिर्के,दत्तात्रय घोडके,सागर राऊत,स्वप्नील टेकाळे,सतीश दत्तू यांनी सहभाग नोंदवला.