अमूल्य मतांनी लोकशाहीला बळ दिल्याबद्दल लक्ष्मी दहिवडी गटातील सर्व मतदारांचे आभार- करुणाताई शिवशरण ; लोकप्रारूप प्रचार यंत्रणेमध्ये सामील शिलेदार विजयाचे होणार माझ्या विजयाचे भागीदार ...


अमूल्य मतांनी लोकशाहीला बळ दिल्याबद्दल लक्ष्मी दहिवडी गटातील सर्व मतदारांचे आभार- करुणाताई शिवशरण

लोकप्रारूप प्रचार यंत्रणेमध्ये सामील शिलेदार विजयाचे होणार माझ्या विजयाचे भागीदार 

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

लोकशाहीचा विजय म्हणजे जनशक्तीने मतदानरूपाने दाखवलेला सन्मान असून हा लोकशाहीचा गौरवशाली सोहळा साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अमूल्य मतांनी लोकशाहीला बळ दिल्याबद्दल लक्ष्मी दहिवडी गटातील सर्व मतदारांचे आभार भावना या गटाच्या उमेदवार करुणाताई जनार्धन शिवशरण यांनी व्यक्त केले आहे.

जागृत आणि सजग मतदार बंधू-भगिनी यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही अधिक सक्षम केली आहे. मतदान हा लोकशाहीचा कणा असून तो प्रत्येक नागरिकाचा अमूल्य हक्क आहे. सकाळपासून मतदान केंद्रांवर दाखवलेला उत्साह, शिस्त आणि जागरूक सहभाग निश्चितपणे कौतुकास्पद आहे.

हीच एकजूट, जागरूकता आणि सहभाग आपल्या गावाच्या, गटाच्या व तालुक्याच्या उज्ज्वल विकासाची खरी ताकद ठरणार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी दिलेल्या प्रत्येक मताबद्दल सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.