मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन - करुणा शिवशरण

मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन - करुणा शिवशरण 

मंगळवेढा/ प्रतिनिधी :- 

लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील मतदार नागरिकांचा सर्व समावेशक आणि अपेक्षित विकास साधने हेच माझ्या लोकसेवेचे प्रमुख व्हिजन असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार करुणाताई जनार्धन शिवशरण यांनी व्यक्त केले आहे. लक्ष्मीदहिवडी गटातील विविध गावांचा गाव भेट प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी तसेच प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली गटातील महिलांचे सर्व गुणसंपन्न सबलीकरण तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षमता प्रस्थापित करण्यासाठी मी मिळालेल्या संधीचे निश्चित सोनं करणार आहे. माझ्या पाठीमागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरीही लोकहिताची आणि लोक संवादाची मोठी शिदोरी माझ्या पाठीमागे खंबीर असल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून एक उद्योजिका या नात्याने मी सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात असून कोणत्याही प्रकारचा जातीभेद अथवा समाजभेद मनामध्ये न ठेवता मी प्रामाणिकपणे माझ्या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक हिताच्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

प्रचार दौऱ्यानिमित्त मतदारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद आणि लोक समर्थांचे मोठे वातावरण हे आमच्या विजयाची प्रमुख नांदी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजकारणात टीकेला फारसे महत्त्व न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकासावर भाष्य करणे आणि विकासात्मक बाबींना प्राधान्य देत जनतेच्या सेवेसाठी उभा राहणे हे परिवर्तनशील समाजक्रांतीचे प्रमुख चित्र आहे.

 त्यामुळे कोणत्याही टीकेला मी टीकेच्या माध्यमातून उत्तर न देता विकासाच्या रूपाने जनतेला दाखवून देणार असल्याचा ठाम निर्धार आणि विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. लक्ष्मी दहिवडी गटाच्या उज्वल भविष्याच्या विकासात्मक वाटचालीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार करुणाताई शिवशरण तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार विनायक यादव आणि दिपाली ताड यांच्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी आशीर्वादाच्या रूपाने त्यांना विजयी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.

चौकट :- 

अपक्ष उमेदवार ज्योती संतोष सोनवले यांचा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा 
लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार ज्योती संतोष सोनवले यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार करुणाताई जनार्दन शिवशरण व पंचायत समिती गणाचे उमेदवार विनायक यादव यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. कोणत्याही प्रकारचे राजकीय समीकरण डोळ्यासमोर न ठेवता केवळ मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला गती देण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. अपक्ष उमेदवार संतोष सोनवणे यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये त्यांना विश्वासात घेऊन आपण या गटातील राजकीय वाटचाल आणि विकासाचे धोरण अवलंबणार असल्याचे मत उमेदवार करुणाताई शिवशरण यांनी व्यक्त करून त्यांचे जाहीर आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.