मंगळवेढ्याचे पत्रकार शिवाजी पुजारी यांना सिध्दापूर फेस्टिव्हलच्यावतीने जनमित्र पुरस्कार घोषीत...

मंगळवेढ्याचे पत्रकार शिवाजी पुजारी यांना सिध्दापूर फेस्टिव्हलच्यावतीने जनमित्र पुरस्कार घोषीत


मंगळवेढा / प्रतिनिधी :- 

 सिध्दापूर फेस्टिव्हल 2026 च्या वतीने मंगळवेढ्याचे जेष्ठ पत्रकार शिवाजी पुजारी यांना पत्रकार क्षेत्रातील जनमित्र पुरस्कार घोषीत झाला असून त्याचे वितरण दि.13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

मंगऴवेढा येथिल पत्रकार शिवाजी पुजारी हे गेली तीस वर्षे वृत्तपत्रीय क्षेत्रात काम करत असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत १ कोटी ६५ लाख रुपयाचा वृध्दापकाळ घोटाळा काढून ६ तहसिलदार जेरबंद केले होते. 

तसेच १६ लाखाचा गुटखा प्रकरणाचा छडा लावून २ पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्याचबरोबर समाजातील पिडीतांना वेळोवेळी न्याय देण्याचेही काम त्यांनी केले आहे. यापुर्वीही त्यांना चांगल्या कामकाजा बद्दल अनेक पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत.

 सिध्दापूर येथील फेस्टिव्हल २०२६ च्यावतीने दि.१३ रोजी सायंकाळी ६:०० वाजता विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. 

यावेळी आनेक मान्यवर उपस्थित राहानार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.