मंगळवेढा /प्रतिनिधी :-
सोलापूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार शुभारंभ व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर माचणूर येथे प्रचाराचा नारळ फोडून भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा भाग म्हणून सदर निवडणूक संदर्भात या प्रचार शुभारंभाचे व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त मतदार बंधू-भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.