राज्य परिवहन मंगळवेढा आगारामध्ये सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन ....

राज्य परिवहन मंगळवेढा आगारामध्ये सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन ....

मंगळवेढा/ प्रतिनिधी :- 

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात जानेवारी महिन्यात रस्ते सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्याकरिता राज्य परिवहन महामंडळ मंगळवेढा आगारात दिनांक १ जानेवारी २०२६ ते दिनांक ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत सुरक्षितता मोहीम राबविण्यात येत आहे. 
सदर मोहिमेचे उद्घाटन दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे साहेब यांचे हस्ते व सोलापूर विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा आगाराचे पालक अधिकारी विनोद खंदारे साहेब, सुरक्षा निरीक्षक घोडके यांच्या उपस्थितीत मंगळवेढा आगारात करण्यात आले.  
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संजय भोसले हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी यांचे आगाराच्या वतीने स्वागत केले. त्यानंतर या मोहिमेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

 उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी विजय पिसे साहेब यांनी उपस्थित चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी यांना रस्ते सुरक्षितता बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच पालक अधिकारी खंदारे साहेब यांनीही उपस्थित कर्मचारी वर्गास सुरक्षितता मोहिमेचे महत्त्व व घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. तसेच अपघाताचे यांत्रिक व मानवी चुका ही कारणे असून सर्वांनी आपल्या कामात उत्तम मानसिकता ठेवून कर्तव्य केल्यास अपघात टाळता येतील व महामंडळाचे होणारे नुकसान टाळता येईल असे मार्गदर्शन केले. 

त्याचबरोबर सहाय्यक वाहतूक अधीक्षक शरद वाघमारे यांनीही सुरक्षिततेबाबत उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित प्रमुख अतिथी व उपस्थित कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रम संपविण्यात आला. 

सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक दत्तात्रय मोरे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी , सहाय्यक वाहतूक निरीक्षक रावसाहेब चव्हाण , आगार लेखाकार योगेश कांबळे तसेच इतर प्रशासकीय कर्मचारी चालक वाहक व यांत्रिक कर्मचारी हे बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.