मंगळवेढा /प्रतिनिधी :-
वीरश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित मंगळवेढा या पतसंस्थेमुळे मंगळवेढ्यामधील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीस आणि सामाजिक विकासास नवे बळ प्राप्त होईल असे प्रतिपादन मंगळवेढा नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सुनदा आवताडे यांनी व्यक्त केले आहे.
वीरश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मंगळवेढा या संस्थेचा भव्य उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योजक प्रसाद कुलकर्णी होते.
या कार्यक्रमास दत्तात्रय भुसे,एड.नंदकुमार पवार, प्रकाश गायकवाड, सोमनाथ आवताडे ,अरुणा माळी, प्रदीप खांडेकर ,पांडुरंग भाकरे, प्रमोद सावजी,भीमराव मोरे, उमाकांत कनशेट्टी, मारुती वाकडे, प्रा.सचिन इंगळे, प्रा.विनायक कलुबर्मे,विक्रम यादव ,सतीश दत्तू, राजाभाऊ चेळेकर,सत्यजित सुरवसे,समाधान फुगारे, नवनाथ दिवसे ,तुकाराम मेटकरी,श्रीपाद शिंदे, राजेंद्र हजारे ,कवी लक्ष्मण हेंबाडे ,सचिन हेंबाडे, विशाल हेंबाडे, सौरभ सावंत तसेच सर्व संचालक मंडळ,कर्मचारी पदाधिकारी आदी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले व आभार मदन पाटील यांनी मानले.