मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
वीरश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मंगळवेढा या संस्थेचा उदघाटन समारंभ आज रविवार दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी यशराज कॉम्प्लेक्स बोराळे नाका येथे होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय विजय भुसे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्षा सुनंदा आवताडे व अध्यक्षस्थान उद्योजक प्रसाद कुलकर्णी हे भूषविणार आहेत.
यावेळी नगरसेवक सोमनाथ आवताडे, सहाय्यक निबंधक व्ही.व्ही.वाघमारे, मराठवाडा शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष जयपाल शेखा शेरखाने, नारायणी पतसंस्था संस्थापक अरुण पवार, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सत्यजित सुरवसे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, उद्योजिका डॉ.प्रियदर्शनी कदम, रुपाली दत्तू, अरुणा माळी, औद्योगिक वसाहत चेअरमन अँड.नंदकुमार पवार,माजी मुख्याध्यापक तुकाराम मेटकरी, उद्योजक उमाकांत कनशेट्टी, नागेश डोके, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन धनंजय पाटील,अमोल ज्वेलर्सचे मालक अमोल रत्नपारखी, माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्था चेअरमन रमेश डोके,संगम विद्यालय मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे, राजमाता अर्बन बँकेचे संचालक पांडुरंग भाकरे, सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय कट्टे, राजमाता अर्बन बँकेचे माजी संचालक डॉ.लक्ष्मण हेंबाडे आदीजन उपस्थित राहणार आहेत.
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेच्या चेअरमन सरोजनी दत्तात्रय भुसे, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ, अधिकारी , पदाधिकारी, कर्मचारी केले आहे.
अर्जुन पाईप्स या उद्योग व्यवसाय माध्यमातून समाजात आधीच विश्वासार्ह ओळख निर्माण केलेल्या अर्जुन पाईप्स या परिवाराने आता वीरश्री पतसंस्थेच्या रूपाने आर्थिक क्षेत्रातही भक्कम पाऊल टाकले आहे. महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि सहकार क्षेत्रातील व्याप्ती अशा नव्या उपक्रमांसाठी संस्थापक दत्तात्रय भुसे यांच्या प्रयत्नातून हे पतसंस्थेचे दालन मंगळवेढा शहरांमध्ये साकार होणार आहे.
दरम्यान कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संचालक मंडळ आणि सभासदांचे मोलाचं सहकार्य लाभले आहे