महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.चिमणरावजी क्षीरसागर महाराज यांचे किर्तन...
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
ढवळस येथील कै. सरूबाई सुदाम जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.चिमणरावजी क्षीरसागर महाराज (संभाजीनगर,ओंकार यात्रा)यांचे सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता स्वगृही त्रिमूर्ती निवास, कुंभार गल्ली, ढवळस येथील प्रांगणात कीर्तन सेवा व दुपारी १२.१५ वाजता पुष्पवृष्टी संपन्न होणार असल्याची माहिती कलेश्वर सुदाम जाधव, महेश सुदाम जाधव यांच्या वतीने देण्यात आली आहे.
अनेक संतांच्या पदस्पर्शाने आणि अस्तित्व आणि पुनीत पावन झालेल्या मंगळवेढा संतभूमी व पंढरपूर देवभूमी अशा दुहेरी संत विचारांच्या पवित्र मातीमध्ये समर्पक आणि मार्मिक किर्तन सेवेच्या माध्यमातून सांप्रदायिक प्रबोधन सेवा मांडण्यासाठी ह.भ.प.चिमणरावजी क्षीरसागर महाराज हे मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत.
तरी नियोजित या कीर्तन सेवेसाठी सर्व रसिक श्रोत्यांनी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ नागरिकांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कलेश्वर सुदाम जाधव,महेश सुदाम जाधव यांनी केले आहे.