मंगळवेढा पंचायत समिती सभापती दिपाली ताड तर उपसभापती अर्जुन मल्लाळे यांची अविरोध निवड...

मंगळवेढा पंचायत समिती सभापती दिपाली ताड तर उपसभापती अर्जुन मल्लाळे यांची अविरोध निवड...

मंगळवेढा / प्रतिनिधी : -

मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दिपाली आनंद ताड यांची तर उपसभापती अर्जुन मल्लाळे यांची अविरोध निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत आ. समाधान आवताडे यांच्या नेतत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सहा सदस्य विजयी झाले असून सभापती व उपसभापतीसाठीची निवडणूक प्रक्रिया पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संतोष देशमुख, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी डाँ.जस्मिन शेख यांच्या उपस्थित पार पडली.

 सभापती पदासाठी दिपाली ताड तर उपसभापती अर्जुन मल्लाळे यांचा उमेदवारी अर्ज नगरसेवक सोमनाथ अवताडे,जिल्हा परिषदेचे प्रदीप खांडेकर ,रमेश भांजे ,करुणा शिवशरण ,संगीता दुधाळ व पंचायत समिती सदस्य जयश्री कवचाळे ,मोहिनी गणपाटील, डॉ.आप्पासाहेब निकम, विनायक यादव यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे दोघांच्या निवडी बिनविरोध झाल्याची जाहीर करण्यात आल्या.

 निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान,मंगळवेढा तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी,आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांसाठी मनरेगा योजना, बेघरासाठी घरकुल योजना प्रभावीपणे व नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आ.समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नूतन सभापती दिपाली ताड यांनी सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.