ढवळस गावातील जनतेला शासनाच्या उपक्रमाचा फायदा व्हावा या माहितीसाठी महत्त्वपूर्ण बैठक...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून प्रेरित हे महाराजस्व अभियान म्हणजे जनतेशी थेट नाते संबंध जोडणाऱ्या लोकाभिमुख प्रशासनाचे खरे दर्शन घडावे या दृष्टीने मंगळवेढा महसूल विभाग व विविध अनेक शासकीय विभाग यांच्या अंतर्गत मंडल निहाय शिबिर आयोजित केले आहे.तरी ढवळस गावातील जनतेला शनिवार दिनांक १४/०३/२०२६ रोजी आंधळगाव येथे मारापुर व आंधळगाव मंडलासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराची आढावा बैठक ढवळस गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
सदरप्रसंगी गावकामगार तलाठी महम्मद काझी, ग्रामसेवक प्रताप ढोबळे यांनी उपस्थित नागरिक, अधिकारी व आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, ती फक्त भौगोलिक स्वरूपाची नव्हती, तर ती रयतेच्या सुख-समृद्धी आणि न्यायाची होती. त्यांनी प्रशासनाला नेहमीच लोकाभिमुख ठेवले. त्याच विचारांना उजाळा देत, महाराष्ट्र शासनाने राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान - समाधान शिबीर सुरू केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचा फायदा ढवळस गावातील जास्तीत-जास्त नागरिकांना , ग्रामस्थांना व्हावा या दृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाशी संबंधित असलेल्या नागरिकांच्या सर्व अडचणींचे निराकरण करण्यासाठी नागरिकांची अडवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, अनेक लाभार्थ्यांना थेट शासकीय योजनांचे लाभ मिळाले. सदर उपक्रमाच्या माध्यमातून शासन थेट जनतेच्या दारी पोहोचत असल्याने हा उपक्रम म्हणजे राज्य महसूल खात्याच्या गतिमान कार्य सक्षमतेचे महत्वपूर्ण पाऊल आहे.
यावेळी माजी सरपंच आबासाहेब मोरे, दत्तात्रय आवताडे,युवक नेते मंगेश मोरे, पत्रकार सचिन हेंबाडे, अमर मोरे, बंडू कवडे, कोतवाल नानासो कोळी यांच्यासह गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.